आज सकाळी ६ वाजता अबकारी खाते आणि निवडणूक विभाग यांच्या संयुक्त कारवाईत ७५० बॉक्स दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
गोवा येथून हा साठा आणण्यात येत होता. रॉयल ब्ल्यू नावाच्या गोवा बनावटीच्या बाटल्या आणण्यात येत होत्या. हा साठा घेऊन येणाऱ्या आयशर वाहन वाहन ही जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी एस झियाउल्ला यांनी ही माहिती प्रसिद्ध केली आहे.