सीमावासीयांच्या मनात सतत सलत असलेली बेकी दूर झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन प्रमुख नेते किरण ठाकूर आणि दीपक दळवी यांच्यात एकि झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री पर्यंत बैठक घेऊन दोन्ही नेत्यांनी समज, गैरसमज, आरोप आणि प्रत्यारोप संपवून टाकले असून समितीत एकि झाली रे अशी आरोळी ठोकली आहे.
कोल्हापूर येथे झालेली उमेदवार निवड आणि नंतर प्रत्येक मतदारसंघात दोन दोन उमेदवार हा प्रकार सीमावासीयांना त्रासाचा होता. मराठी विरुद्ध मराठी असे वातावरण समितीसाठी धोक्याचे होते. यातच एकमेकांवर जोरात आरोप होते. हे सगळे होत असताना कुठेतरी चमत्कार व्हावा हीच अपेक्षा होती, या अपेक्षेला दीपक दळवी आणि किरण ठाकूर या दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एकि झाली.
आता उद्या कोणत्या मतदारसंघातून कुणाची माघार हे नक्की होईल, प्रत्येक ठिकाणी एकच उमेदवार उभा राहील आणि विरोधकांचे डिपॉजीट जप्त होईल यात शंका नाही.