1 जून 1956 साली झालेल्या भाषावार प्रांत रचनेत बेळगांव सह सीमा भाग कर्नाटकात डांबण्यात आला तेंव्हापासून गेली 62 वर्ष सीमा भागातले मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत.महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी बेळगावच्या लढ्याला पाठिंबा देत आलेत. सध्या बेळगावात विधानसभा निवडणूक सुरू आहे असं असताना महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी एकीकरण समितीच्या विरुद्ध प्रचार करायला सुरुवात केली आहे.
एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला असताना भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी बेळगावतल्या मराठी उमेदवारां विरुद्ध प्रचार करायला सुरुवात केली आहे.भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसा पूर्वी खानापुरात सभा घेतली होती तर ग्रामीण मतदार संघात सभा घेणार आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची शुक्रवारी बेंनकनहळळीत सभा आहे.ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बेळगावने पहिला हुतात्मा दिला त्याच बेळगावच्या अधुऱ्या लढाईत महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेस नेत्यांकडून साथ देण्या ऐवजी निवडणुकीत विरोधात प्रचार करत आहेत.
एकीेेकडे अशोक चव्हाण आणि नितीन गडकरी यांनी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 105 हुतात्म्यांचा अवमान केल्याची आणि कानडी अन्याय अत्याचार सोसणाऱ्या बेळगावकरांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची भावना सीमा बांधव व्यक्त करत आहेत.
Trending Now