प्रवेश नाही, पाठींबा नाही अशा कुरबुरी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी केल्या तरी प्रत्यक्ष परिस्थिती पाहता किरण सायनाक यांचेच पारडे जड आहे. कुरबुरी करण्यामागे राष्ट्रीय पक्षांचा हात असल्याचा संशय आहे.
समितीचे दोन उमेदवार आहेत, या स्थितीचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी राष्ट्रीय पक्ष धडपडत आहेत. यात भांडण वाढवण्याचे प्रयत्न जास्त आहेत. गल्ली गल्लीत फलक लावून प्रचार केला जाताना किरण सायनाक यांना पाठींबा नाही असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. पण याचा म्हणावा तसा फरक सायनाक यांच्या प्रचारावर दिसत नाही. उलट ते मुसंडी मारून पुढे जात आहेत.
काँग्रेसने बाहेरचा उमेदवार दिला तर भाजप पक्षाची व उमेदवाराची प्रतिमा मलिन आहे, त्यात राष्ट्रीय पक्ष बाजूला फेकले जाऊन समितीच्या दोन उमेदवारात लढत लावली जात आहे. यात जास्त मते घेण्याची क्षमता किरण सायनाक यांच्यातच आहेत.