मतदान १२ मे ला होणार आहे. प्रचार जोरात सुरू आहे, आता वातावरण तापायला लागले आहे.सगळेच पक्ष आणि उमेदवार एकमेकांवर आरोप करत आहेत. चिखलफेक सुरू आहे, जास्त मते मिळवण्यासाठी गल्ली गल्लीत जाऊन आपली बाजू मांडायच्या स्पर्धा सुरू आहेत.
राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा झेंडा व अजेंडा घेऊन कामाला लागले आहेत. ते विकास हा मुद्दा घेऊन लढत आहेत. हे करणार, ते करणार असे सांगितले जात आहे.
मे महिना तप्त झाला आहे. ऊन वाढत आहे, त्यातच राजकीय आरोपांनीही वातावरण तापत आहे. आपला विरोधी उमेदवार कसा खोटा, भ्रष्ट आणि कुचकामी हे सांगून मतदारांना आकर्षून घ्यायचा खेळ रंगत आहे.