राज्यातील कॉंग्रेसचे सरकार हे लुटारूंचे सरकार आहे देशातील जनतेच्या भविष्य साध्य करणारी निवडणूक आहे केवळ विकासाच्या वल्गना कॉंग्रेस नेत्याकडून होत आहेत विकास जन सामन्याचा झाला नाही केवळ कॉंग्रेसच्या नेत्यांचा स्वताचा विकास झालाय अशी टीका केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे सोमवारी दुपारी खानापूर येथील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ गडकरी यांनी सभा घेतली.
कॉंग्रेसच्या नेत्यांनी पाच वर्षात मुसलमानात भीती निर्माण केली जातीयवाद वाढवला लिंगायता मध्ये गट पाडले. भाजप विरोधात भडकवण्यासाठी काम कॉंग्रेस कडून केले जात आहेत अश्या सरकारला सत्तेत आणणे म्हणजे कर्नाटकचे वाटोळे करण्या सारखे आहे यावेळी विठ्ठल पाटील बाबुराव देसाई,उज्वला बडवानाचे सुरेश देसाई बाबांना पाटील आदी उपस्थित होते.