महानगरपालिका अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकरांचा भाचा निखिल धनराज निप्पाणीकर यूपीएससी उत्तीर्ण झाला आहे. देशभरात त्याचा ५६३ व रँक आला असून त्याला आयएएस किंवा आयपीएस यापैकी एक पद मिळू शकेल.
तो सेंट पॉल्स शाळेचा विध्यार्थी असून सीईटी परीक्षेत पहिला येऊन त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. त्याला प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होती यामुळे यूपीएससी परीक्षेला बसून पहिल्याच वेळी तो यशस्वी झाला.