खानापूर मतदार संघातले निधर्मी जनता दलाचे उमेदवार नासीर बागवान हे बेळगाव जिल्ह्यात निवडणूक लढवण्याऱ्या पैकी सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत . खानापूर प्रांत अधिकाऱ्या कडे निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात बागवान यांनी १९१ कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे.
बागवान हे सध्या जनता दलाचे उमेदवार असून त्यांनी मागील वेळी बेळगावातून लोकसभा निवडणूक लढवली होती.बागवान यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांनी तब्बल १९१ कोटींची जाहीर केली आहे खानापूर तालुक्यातील उद्योजक व्यापारी शेतकरी आहेत. आय टी आय शिक्षण पूर्ण करून त्यांनी व्यवसायात उडी घेतली होती. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी ९६ कोटींची मालमत्ता असल्यचे जाहीर केले होते. स्वताला शेतकरी उद्योजक म्हणून त्यांनी जाहीर केले होते.