दक्षिण मतदार संघातील अर्ज छाननी प्रक्रियेत नगरसेवक विनायक गुंजटकर यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे निवडणूक प्रक्रियेत दक्षिण मतदार संघातून तब्बल २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यात विनायक गुंजटकर यांचा आणि सकाराम कृष्णा लोकरे या दोन्ही अपक्षांचे यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. बुधवारी सकाळी महा पालिकेतील कार्यालयात अर्जांची छाननी झाली.
उत्तर मतदार संघात देखील एक अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे जनता दलाचे अधिकृत उमेदवार म्हणून एस धर्मराज यांना बी फॉर्म देण्यात आला होता मात्र काल अश्फाक मडकी यांनी जनता दलाच्या वतीने सी फॉर्म भरून अधिकृत उमेदवारी मिळवली होती त्यामुळे धर्मराज यांचा एकमेव अर्ज उत्तर मतदार संघातून बाद ठरवण्यात आला आहे. आता एकूण १८ जणांनी अर्जपुढील प्रक्रियेसाठी उरले आहेत.
ग्रामीण मतदार संघातून एकूण १८ जणांनी अर्ज दाखल केले होते त्यातील तीन उमेद्वारांचे अर्ज बाद झाले आहेत. बुधवारी सकाळी अर्ज छाननी प्रक्रियेत या अर्जांना अवैध ठरवण्यात आले. जयश्री कांबळे,संजीव गणाचारी,रामचंद्र बडकी या तिघांचे अर्ज बाद ठरले त्यामुळे पुढील प्रक्रियेस १५ जन रिंगणात आहेत. २७ एप्रिल दुपारी तीन पर्यंतअर्ज मागे घेण्याची मुदत असून चार वाजता प्रचार चिन्ह देण्यात येणार आहेत .