Sunday, December 1, 2024

/

‘बेळगावी चे झाले बेलगाम’ झी न्यूज वर झळकला मराठीचा आवाज…

 belgaum

बेळगावातून विधानसभा निवडणूक कव्हर करणाऱ्या  हिंदी वृत्त वाहिनीला बेळगावी म्हणून उल्लेख केल्याने संतप्त मराठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून बेळगावी च बेलगाम अस नामकरण करण्यास भाग पाडले आहे.बेळगावातील युवकांच्या मागणीची दखल झी न्यूज सारख्या राष्ट्रीय वृत्त वाहिनीने घेतली आहे.

Zee news

कर्नाटक विधान सभेची रणधुमाळी कव्हर करण्यासाठी देश पातळीवरील वृत्त वाहिन्या बेळगावात दाखल होऊन कव्हरेज करत आहेत.’ताल ठोक के’ हा झी न्यूज या हिंदी वृत्त वाहिनीचा ‘कर्नाटक पोलिटिक्स लीग’ चर्चेचा असा थेट प्रक्षेपण कार्यक्रम बेळगावात घेण्यात आला होता.सुरुवातीला या कार्यक्रमात वृत्त निवेदक शहराचे नाव बेळगावी असा उल्लेख करत होते त्यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारत घोषणाबाजी करत बेलगाम असा उल्लेख करण्यास भाग पाडले.

कर्नाटक निवडणुकी बद्दल केंद्रीय राज्य मंत्री अनंतकुमार हेगडे यांच राज्य घटने संदर्भातील वक्तव्य,शेतकरी आत्महत्या, कळसा भांडूरा पाणी वाटप वाद, भ्रष्टाचार तसेच सीमा प्रश्न आणि मराठी वरील अन्याया बाबत चर्चा झाली. समितीच्या वतीने अनिल चौधरी, मदन बामणे यांनी तर भाजपचे धनंजय जाधव, काँग्रेसचे यल्लप्पा ढेकोळकर निधर्मी जनता दलाचे सय्यद मन्सूर यांनी सहभाग नोंदवला होता.

खालील लिंक क्लिक करून झी न्यूज वरील पूर्ण कार्यक्रम पाहू शकता

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.