*आपल्या मुलांना तुम्ही छोट्या वयातच अशा प्रकारे सामाजिक कार्य करण्याची शिकवण देता आहात ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही जमवलेल्या रद्दीतूनच गरीब विद्यार्थ्याना मदत होणार आहे,त्यासाठी तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो व हे कार्य असेच सुरु ठेवा अशी विनंती करतो* अशा शब्दांत माजी महापौर व शांताई वृध्दाश्रमाचे * विजय मोरे* यांनी कौतुक केले.
हिंडलगा गणेशपूर येथील *सिंडिकेट बैंक कॉलनीतील* सौ.शोभा पै यांच्या निवासस्थानी रविवारी दि.22 एप्रिल रोजी सायंकाळी *संस्कार केंद्रात* आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.संस्कार केंद्रातील छोट्या छोट्या मुलांनी आपल्या कॉलनीतील घराघरातून जमविलेली रद्दी यावेळी *रद्दीतून बुध्दि* या श्री विजय मोरे यांच्या उपक्रमासाठी सुपुर्द करण्यात आली.या निमित्त प्रार्थना, सूर्य नमस्कार, आसने,श्लोक पठण,भक्ती गीत,नाटिका,असे विविध कार्यक्रम मुलांनी सादर केले.छोट्या संपदाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन तर भूमी,शिवानी,नंदन,गंगाधर, धुंडय्या,मीना,साई ,सुशीला या मुलांनी साथ दिली. *काकडे फौंडेशनचे किशोर काकडे* यांनीही मुलांचे मार्गदर्शन केले व पालकांचे कौतुक केले.सौ.शोभा पै,अरुणा सरप,व ईतरांनी विशेष परीश्रम घेतले पण *सर्व कार्यक्रम मुलांनीच आयोजीत केला होता त्याबद्दल साऱ्यांनी शाबासकी दिली*