बेळगाव दक्षिण मतदार संघातून निधर्मी जनता दलाच्या वतीने प्रकाश सनेमा ग्रहाचे संचालक महेश कुगजी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जनता दलाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीत कुगजी यांना बेळगाव दक्षिणेतून उमेदवारी मिळाली आहे.
३ एप्रिल रोजीच बेळगाव live ने कुगजी यांना जे डी एस ची बेळगाव दक्षिणेची उमेदवारी मिळेल अस वृत्त प्रसारित केल होते .यावेळी जेडीएस प्रणित तिसऱ्या आघाडीचे सरकार येणार आणि कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माल पडणार असे अनेक संस्थांच्या निवडणूक पूर्व अहवालात बाहेर आले आहे, यामुळे मराठी आणि कन्नड आशा दोन्ही भाषिक मतदारांमध्ये चालेल असा चेहरा जे डी एस ने शोधला आहे
उद्योजक, चित्रपट वितरक आणि सामाजिक कार्यकर्ते ही ओळख आहे. राजीव गांधी ब्रिगेड चे जिल्हाप्रमुख, काँग्रेस चे शहर जनरल सेक्रेटरी, इंटक चे जिल्हा उपाध्यक्ष ही काँग्रेस मधील महत्वाची पदे सोडून ते जे डी एस मध्ये गेले आहेत.