समितीतील दोन्ही गटात एकीची प्रक्रिया राबवसाण्याठी कै सुरेश हुंदरे स्मृती मंच प्रयत्नशील असताना दुसऱ्या गटाकडून उमेदवारी जाहीर होत आहे या बद्दल मंच ची भूमिका काय असा प्रश्न विचारला असता लवकरच मंच यावर प्रतिक्रिया म्हणून एक पत्रक काढणार असल्याची माहिती हुंदरे स्मृती मंचच्या वतीने देण्यात आली आहे.
रविवारी शिवाजी उद्यानात हुंदरे स्मृती मंच च्या वतीने एकीसाठी एक दिवसीय धरणे अनेडोलन आयोजित करण्यात आले आहे.एकीसाठी प्रयत्नशील असलेल्या पाईकानी स्मुर्ती मंच वकील राम आपटे यांच्यासह सर्व जेष्ठ नेत्यांच्या भेट घेऊन एकी संदर्भात चर्चा केली. धरणे आंदोलन संपल्यावर समितीचे पाईक आणि स्मृती मंच पदाधिकाऱ्यात बैठक होऊन पुन्ह एकदा दोन्ही अध्यक्षांना एकत्र बसवून एकीचे प्रयत्न केले जाणार आहेत. शिवाजी उद्यानात पाईकांनी स्मृती मंच पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.