Thursday, January 23, 2025

/

?एप्रिल 21 ते 28 राशीफल?

 belgaum

?मेष-या सप्ताहात कौटू बिक कार्यात यश मिळेल.एखादे खरेदी चे योग येतील.घरातील वातावरण प्रसन्न राहील.नोकरिव्यवसायत असणाऱ्यांना काळ चांगला आहे आपण केलेल्या कष्टाचे फळ मिळेल.सरकारी कामे मार्गी लागतील. महिलांना हा सप्ताह उत्तम असा असेल.मना सारख्या गोष्टी घडतील.
?वृषभ-कला क्षेत्रात काम करणार्यांना यश मिळेल. तसेच नवीन वास्तू होण्याचे योग येतील किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदीचे योग येतील.या काळात मधुमेह असनर्यांनी प्रकुर्तीची काळजी घ्यावि.काहींना पोटाच्या तक्रारी जाणवतील.व्यवसायात असनर्यांनी भागीदारी व्यवसायात व्यवहार जपून करावे.नवीन गुंतवणूक व्यवसायात अडचणी निर्माण करेल.विलंबाने कामे होतील. प्रवास होतील.
?मिथुन-या सप्ताहात खर्च वाढतील घरातील वातावरण नरम गरम राहील.वैवाहिक जोडीदाराशी काही वादाचे प्रसंग उदभवतील.नोकरीत असणार्याना या काळात वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून काही अपमानास्पद वागणूक मिळेल.त्यामुळे आपण शांत राहावे.व्यावसाईक लोकांनी या काळात विचार पूर्वक निर्णय घेतल्यास ते फायदेशीर ठरेल.या काळात उष्णतेचे त्रास जाणवतील.
?कर्क-हा सप्ताहात आपणाला चांगला राहील मित्रांपासून लाभ होतील.काही आर्थिक लाभ होईल. तसेच घरात वातावरण प्रसन्न राहील.परंतु ज्यानां कमरेची त्रास असतील या काळात त्रास वाढतील.इलेक्ट्रिक व्यवसायात असणाऱ्यांना लाभदायक सप्ताह राहील काही नवीन उपक्रम सुरू कराल.महिलांना संतती संबंधी चिंता निर्माण होईल.या काळात मुलांकडे विशेष लक्ष द्यावे.नोकरीत असणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणीकाही मतभेदाचे प्रसंग येतील.
?सिंह-या सप्ताहात आपणाला संतांचा सहवास लाभेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मानसन्मान मिळेल आपल्या कार्याचे कौतुक होईल.पण जे विद्यार्थी परीक्षा देणार असतील त्यांनी या काळात अ भ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.हा काळ कठीण असला तरी आपण प्रयन्त केल्यास यश मिळेल. विवाहितांनीं आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
?कन्या-हा सप्ताहात आपणास वास्तूचे योग येतील. खर्चाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे आर्थिक कोंडी कमी होईल.व्यावसायिकांना मध्यम असा काळ ना नफा ना तोटा असा राहील.सध्या नवीन कोणतंही उपक्रम सुरू करू नका अपयश येईल.महिलांना सप्ताह अखेर प्रवास घडतील.
?तुला-या सप्ताहात आपण स्वकर्तुत्वाने काही तरी करून दाखवाल.तसेच आपल्या भावंडाच्या प्रकुर्तीची चिंता निर्माण होईल.मैदानी खेळात असणाऱ्याना विद्यार्थी अथवा व्यक्तींना या काळात यश मिळेल.विवाहयोग्य तरुनतरुणींनी विवाह होण्याचे अथवा जमण्याचे योग येतील.या सप्ताहात महिलांनी कौटूंबिक वाद पासून दूर राहावे.तसेच शेअरमार्केट मध्ये असनर्यांनी या काळात नवीन खरेदी नुकसान दायी असू शकते. या काळात आपणाला संगीत वाद्य शिकण्याची आवड निर्माण होईल.
?वृश्चिक-या सप्ताहात आपला खाण्यापिण्याच्या बाबतीत तोल सुटेल.मांसाहार करत असाल तर अति मांसाहार प्रकुर्तीला घातक ठरू शकतो.खर्चाचे प्रमाण वाढेल.डोळ्यासंबंधी त्रास होतील. नोकरीत असणार्या मात्र बढतीचे योग येतील विशेष करून सरकारी नोकरीत असणाऱ्याना.भागीदारी व्यवसायात असणार्यांनी नवीन उपक्रम सुरु करण्यास उपयुक्त काळ.तसेच आपल्या वैवाहिक जोडीदार बरोबर बिघडलेले सबंध सुधरतील .एखाद्या धार्मीक ठिकाणी दानधर्म कराल.
?धनु-या सप्ताहात आपल्या मुलांच्या प्रगतीच्या बातम्यांमुळे मन प्रसन्न राहील. तसेच नव विवाहिताना संतती कारक सप्ताह.सरकारी कामे पूर्ण होण्यास अडथळे येतील.हा काळ आपणास थोडा त्रास दायक राहील साडेसाती व पुन्हा वक्रीय शनी यामुळे थोडा जाणवेल.महत्त्वाचे कागदावर सह्या करतांना काळजी घ्यावी.या काळात काही महत्वाचे निर्णय काही काळा पुरते पुढे ढ कलल्यास उत्तम.महिलांनी या काळात प्रकुर्तीची काळजी घ्यावी .नोकरी व्यावसाईकांना आर्थिक प्रगती होईल.
?मकर-या काळात आपल्या नातेवाईका मध्ये असणारे वाद कोर्टात जाण्याची शक्यता आहे.या सप्ताहात नवीन जमिन किंवा घर खरेदी करताना कागदपत्रे नीट तपासून मग व्यवहार करावे.नोकरी व्यावसायिकांना कामासाठी प्रवास ?घडेल.या काळात कुटुंबातील वातावरणात नरम राहील पण मुलांच्या प्रगती च्या बातम्या स माधान देतील.या काळात कर्जाचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यावसायिकांना मध्यम काळ राहील.महिलांना या काळात कामाचा ताण सहन करावा लागेल. घरात पाहुण्याचे आगमन होईल.
?कुंभ-या सप्ताहात खर्चाचे प्रमाण वाढेल.प्रवासात त्रास होतील. मात्र कोर्टकचेरी कामात यश मिळेल. त्यासंबंधी व्यवहार यशस्वी होतील. या काळात आपण विचित्र पणे वागाल.मुलांनी वाईट मित्रानं पासून दूर राहिल्यास उत्तम.व्यावसायिकांना काही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.महिलांनी या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
?मीन-या सप्ताहात आपण एखाद्या मंगल कार्यात भाग घ्याल. व्यावसायिकांना आर्थिक व्यवहार मार्गी लागतील.या काळात काही महत्वाच्या गोष्टी घडतील. तरुनतरुणींनी विवाहास उपयुक्त काळ आहे.त्या सबंधी बोलणी यशस्वी होतील. मुलांना सहलीचा आनंद घेता येईल.महिलांना कौटूंबिक सौख्य लाभेल. नोकरी व्यावसायिकांना लाभदायी सप्ताह राहील.या काळात उष्णतेचे त्रास वाढतील

?जोतिष?
उषा सुभेदार
कोरे गल्ली,शहापुर,
बेळगाव,
8762655792

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.