आगामी विधान सभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण दक्षिण आणि उत्तर आणि खानापूर मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी व्हावी एकास एक उमेदवार देण्यात यावा म्हणून लाक्षणिक आत्मक्लेश उपोषण करण्यात येणार आहे.
कै सुरेश हुंदरे स्मृती मंच च्या वतीने हे आत्मक्लेश उपोषण करण्यात येणार आहे. ९२ वर्षीय सीमा सत्याग्रही वकील राम आपटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन हुतात्मा स्मारका समोर रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत केले जाणार आहे. यावेळी जेष्ठ सीमा सत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे, वकील किसनराव येळ्ळूरकर सह शेकडो मराठी बांधव या उपोषणात सहभागी होणार आहेत अशी माहिती हुंदरे स्मृती मंच च्या वतीने देण्यात आली आहे.
एकीकडे युवकांची संघटना पाईक प्रयत्नशील होती मात्र एका गटाकडून त्या युवकांना खीळ घालण्यात आला आता हुंदरे स्मृती मंच ळा एकीसाठी यश मिळो हीच सदिच्छा…