सीमाभागातील सर्व मराठी भाषिक आपल्या माय मराठीच्या राज्यात जाण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा देत आहेत आता सीमाप्रश्न अंतिम टप्पात आला आहे अशा वेळी सर्वांनी समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे असून एकीने आपली ताकत दाखविली पाहिजे.
सध्या महाराष्ट्र एकीकरण समिती मध्ये एकी होणार की नाही याबाबत वेगवेगळे मत प्रवाह पुढे येत आहेत परंतु प्रत्येक मराठी भाषिकाने एकी व्हावी या करिता आपला दबाव वाढविला पाहिजे तरच एकी होऊ शकेल अन्यथा दुहीमुळे विरोधी पक्ष लाभ उठवतील आणि मराठी भाषिकांच्या आशा आकांक्षावर पाणी फिरेल म्हणूनअजून ही वेळ गेलेली नाही त्यामुळे प्रत्येक नेत्याने योग्य तो विचार केला पाहिजे.
समितीच्या भल्यासाठी आपला इगो बाजूला ठेऊन कार्य करावे हीच अपेक्षा सर्व सामान्य मराठी माणसातुन व्यक्त होत आहे.बेकी आहे म्हणून मराठी जणांनी शस्त्र टाकण्या पेक्षा उठ मराठ्या जागा हो माणुसकीचा धागा हो म्हणून काम करण्याची वेळ आली आहे