सगळ्यांसनं सभागी करोन घून एकी करतल्या कामात समिती नेते कमी पडल्याताय, एकीचा बाजार करून बेकीचा परचार करतल्या कामास सुरवात झाल्ली हाय, अत्त कोन कुनाचा याची इभागनी सुरू हाय, जनतेच्या मनातलाच निवडून आनतला अश्याल तर आजूनबी सगळ्यांनी शानं हुस पाजे.
ती पाईक पोरं लई दिवस परयत्न करूल्यात, त्यांसनं नेत्यांनी जरा बी दाद देऊस न्हात, पोरं अत्त चिडोन बसल्याताय, त्यांसी समजोन कोन संगनार ह्योच गंभीर परस्न निर्मान झालाय, तव्वा तरुनानी नोटा करतला निर्णय बी ऐकोस येऊ लागलाय.
कव्वा कव्वा समितीत सोतासच उमेदवारी पाजे म्हणोन बेकी झाली तव्वा तव्वा पदरात नुकसान पडलाय, म्हणोन माझं एक सांगनं हाय, आजूनबी एकि कराच.