या देशात बेटी सुरक्षित राहण्यासाठी जागे व्हा असा नारा आणि इशारा मराठा मंडळ संस्थेतर्फे देण्यात आला आहे. कार्याध्यक्ष राजश्री नागराज यांच्या पुढाकाराने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. त्या बाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की काथुआ व ऊंनाव येथील घटनेने पुन्हा निर्भया कांडा ची आठवण करून दिली आहे,खरे तर स्त्री पुरुष समतेवर भर दिला आहे पण ती कागदावरच आहे, महिलांना तक्रार करता यावी यासाठी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी she box हे अँप सुरु केले आहे,मात्र एकूण चित्र दुःखदायक आहे,मराठा मंडळ दोन्ही मुलींच्या कुटुंबा सोबत आहे परंतु सरकारने आता कठोर पाऊल उचलून आरोपीना शिक्षा करावी व या देशातील बेटिना सुरक्षा द्यावी,या मोर्चात असंख्य विद्यार्थी व प्राध्याक सहभागी झाले होते,
Less than 1 min.
Previous article
Next article