सार्वजनिक सभेत जातीय तणाव निर्माण करणारे भडकावू भाषण केल्याचा ठपका ठेवत आमदार संजय पाटील यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याचवेळी काँग्रेस पक्षाने त्यांना निवडणुकीतून उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
गुरुवारी सायंकाळी सुळेभावी येथे भाजपची सभा झाली. तेथे भाषणावेळी बेळगाव ग्रामीणचे आमदार संजय पाटील यांनी भडकावू भाषण केले असल्याचा ठपका ठेवत भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी मारिहाळ पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणे, सामाजिक शांततेचा भंग करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करून घेतला आहे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नुर तपास करीत आहेत.
तर कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी वेंकटेश्वर, एम एन सूरज हेगडे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.