काँग्रेस मध्ये असताना महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आमदारकीसाठीच्या उमेदवारिस अर्ज का…? असा प्रश्न विध्यमान जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांच्याबद्दल उपस्थित झाला होता. यावर बोलताना मी मराठी भाषिक आहे, मराठी मातीशी इमान बाळगणारा आहे, त्यामुळे समितीकडे अर्ज करण्याचा आपल्याला हक्क आहे. तरीही काँग्रेस पक्षाने नोटीस दिल्यास त्यांना योग्य उत्तर देऊ अशी बाजू मांडली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती सर्वसमावेशक आहे, प्रत्येक मराठी भाषिक माणसाला आपल्या भाषेबद्दल तळमळ पाहिजे. त्या तळमळीनच मी अर्ज केला आहे. कुठल्या राष्ट्रीय पक्षाकडे मी अर्ज दिलो नाही असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पंचायती साठी समितीचे तिकीट मिळावे म्हणून मी सलग तीन महिने प्रयत्न केले होते. पण ते तिकीट नाकारल्यामुळे मी काँग्रेस कडे गेलो होतो. परंतु मी काँग्रेस चा उमेदवार झालो म्हणून निवडून आलो नाही तर मराठी भाषिक, माणूस मोहन मोरे म्हणून मला नागरिकांनी भरगोस मतदान दिले आहे.जनतेने मला पाठींबा देऊन निवडून दिले. मी पक्षाच्या नव्हे तर जनतेच्या आणि स्व बळावर निवडून आलोय.
बेळगुंदी मतदार संघात कधीच कुठल्याच राष्ट्रीय पक्षाची सीट निवडून आली नाही, ११००० मतदान देऊन लोकांनी आपला माणूस म्हणून मला निवडून दिले आहे.
माझ्यावर जनतेचा विश्वास आहे. जिथे काँग्रेसला फक्त १८०० मतदान मिळत होते तिथे मी बक्कळ मतदान घेतले आहे. आता आमदारकीसाठी समितीने माझ्यावर विश्वास दाखवल्यास मी भरगोस मतांनी निवडून येईन.याची खात्री आहे.असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने कारण विचारलं तर मी हा निर्णय का घेतला याचे कारण देईन. असेही सांगितले.
दोन्ही समितींनी उमेदवारी नाकारली तर अपक्ष म्हणून मी आमदारकीची निवडणूक लढवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.