कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली तव्वा पासून बघूलाव, चाईस येला गेल्ला मियाच आमदार म्हनूस लागलाय, त्यांसनं संगोचं वाटताय, अरे बाबानू आमदारकी काय बी म्हणीनास सोप्पी नव्हे.म्हाराष्ट्रात जातलं सपान घून चालतानं असं स्वार्थ धरून जाऊ नकोस तिय्या,
लोकं शानी हाताय,कुणास आपला लीडर म्हणतलं ते त्यांसनं बरोबर कळताय, खरं कापडं शिऊन बसल्यात त्यांसनं काय सांगनार, हेच माज कळेना झालाय.
समितीत परतेक मतदारसंघात धा धा इचुक हाईत, सगळे कार्यकर्ते हाईत खरं सगळेच उभे ऱ्हाले तर दुसरे निवडोन येण्याची संधीच जास्त हाय, इमान बाळगोचं म्हणोन लोकं मत घालूस तयार हाताय खरं नेत्यांचं काय बी कळेना झालाय, तरुन पोरं बी सामील झाल्याताय, एकी करा म्हनूल्याताय तरीबी शाने होतलं नाव काढिनाताय, अत्ततरी जरा आपली शानपानं बाजूस ठुन काम करल्यानी तरच इजय होनार हाय.
बाकीच्या पक्षातनं बी काय यगळी गोष्ट नाय, त्यांसनं बी सगळ्यांसनं तिकीट पायजेत, तव्वा त्या लोकांनी जरा दमान घून कुनास तर बी एकास निवडोन देन्याची तयारी करुची लागनार हाय.
मिय्या तर म्हंतो राजकारनात दुस्मनी घून काय बी फायदा न्हाय, जरा एकमेकास संभाळून घेइत पुढे गेले तर चकोट, नायतर डोसकी फोडून घेतला धंदा होनार दुसरं काय?
तुमचाच सीमावासी