कपिलेश्वर ओव्हर ब्रिज आज सकाळी पासून बंद आहे.आज शिवजयंती आहे. प्रशासनाला सुध्दा याची माहीती आहे.यामुळे जाणीवपूर्वक अडचण निर्माण करण्यात आली असल्याची शक्यता आहे.
शिवजयंती निमित्त युवा कार्यकर्ते शिवज्योत वेगवेगळ्या गडांवरून घेऊन बेळगावला धर्मवीर संभाजी चौकात येतात.तिथे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येते.तेथून त्या सर्व शिवज्योत कपिलेशवर उड्डाण पूल मार्गे छत्रपती शिवाजी उद्यान येथे येताच आरती करुन सांगता होते.पण प्रशासनाला शिवजयंती आहे, हे माहीती असुन सुद्धा मुद्दामहून कपिलेशवर उड्डाण पूलाच्या दक्षिण बाजूला रेणुका हाॅटेल शेजारी रस्ता खणन्यात आलाआणि शिवज्योतच्या मार्गावर अडथळा निर्माण झाला.
याचा जाब विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कॉन्ट्रॅक्टरला तसेच ट्राफिक पोलीसांना धारेवर धरले व त्या नंतर एक साईडने रस्ता खुला करून देण्यात आला.हे काम आणखी कधीही करता आले असते पण जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न आहे असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.