विधान सभाउमेदवार निवडीचा अधिकार मध्यवर्तीकडे असताना पदाचा गैरवापर करून निवड जाहीर केल्यामुळे खानापूर तालुका समिती अध्यक्ष दिगंम्बर पाटील यांना अध्यक्ष पदावरून तात्पुरता बडतर्फ केले आहे.
रविवारी सायंकाळी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरील माहिती दिली आहे.
खानापूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी उपाध्यक्ष असलेले देवाप्पा गुरव यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड देखील करण्यात आली आहे. दिगंम्बर पाटील यांनी खानापूर घटक समितीच्या वतीने पाच जणांची कमिटी करून विलास बेळगावकर यांची उमेदवार म्हणून घोषणा केली होती त्या नंतर आमदार अरविंद पाटील यांनी 40 पैकी 27 सदस्यांची एन डी समोर परेड केली होती.
खानापूर उमेदवार निवड पूर्ण झाली असून ती सीलबंद केली आहे लवकरच मध्यवर्ती जाहीर करील अशी देखील माहिती दळवी यांनी दिली.