मेष-हा सप्ताह मागील सप्ताह पेक्षा थोडा त्रास दायक राहील कामे विलंबाने होतील.कामाची धावपळ वाढेल त्यामुळेप्रकुरतीवर त्याचा परिणाम होईल.उष्णतेचे विकार त्रास होतील. या काळात आपण विशेषतः डोळ्याची काळजी घ्यावी.आर्थिक बाबतीत सप्ताह तसा बरा असेल.महिलांना या काळात कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल.व्यावसाईकनि नवीन गुंतवणूक विचार पूर्वक करावी.
वृषभ-यासप्ताहात आपणास काम निमित्त प्रवास घडेल.नोकरिव्यवसायत असणाऱ्यांना लाभदायक सप्ताह राहील. भागीदारी व्यवसायात असणाऱ्या ना यश दायी सप्ताह नवीन ओळखी होतील त्यातून लाभ होतील.महिलांना या काळात दागिने खरेदीचे योग. मुलांना याकाळात नवीन काही शिकण्याची संधी मिळेल.सर्वसाधारण पाहाता सप्ताह चांगला राहील.
मिथुन-या सप्ताहात बेरोजगाराना नोकरी प्राप्तीचे योग येतील.व्यावसाईक लोकां ना तसा हा सप्ताह मंदी चा राहील ना नफा ना तोटा.महिलांना या काळात एखादया सहलीचा आनंद घेता येईल.घरातील वातावरण आनंदी राहील.परंतु नोकरीत असणार्या काहि कामा निमित्ताने प्रवास होईल.परंतु प्रवासात अडथळे येतील.संतती संबंधित चांगली बातमी मिळेल. -सिंह-या सप्ताहात भावंडं व शेजारी यात पुर्वी बिघडलेले संबंध सुधारतील.आपल्या मुलां या काळात नको त्या गोष्टी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.या काळात गरोदर महिलांनी तब्ये तिची काळजी घ्यावि. या काळात आपणाला एखाद्या धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल.परदेश गमनाचे योग येतील.
कर्क-या काळात आपण दुसऱ्याशी बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसे आपण कधी कुणाशी वैर करत नाही या काळात आपण इतरांशी फटकळ पणे वागाल.जमीन घर या सबधी व्यवहार करण्यास काळ अनुकूल आहे.या सप्ताहात आपणास कमरे संबंधी दुखणी जाणवतील.कला क्षेत्रात करिअर करणाऱ्या साठी अनुकूल कल आहे.नवीन संधी उपलब्ध होतील.
कन्या-एकत्र कुटूंबात असणाऱ्यांना उत्तम काळ या काळात कुटुंबा सोबत फीरायला जाण्याचे योग्य येतील.कुटूंब सोबत जास्तीजास्त वेळ घालवला.त्यामुळे मन प्रसन्न राहील.परंतु या काळात सरकारी कामात अडथळे येतील त्या सं बंधी कामे पूर्ण होणार नाही.व्यावसायिकांना काही आर्थिक नुकसान संभवते.
तुला-आपल्या खाण्यापिण्याच्या सवई वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या काळात आपण धार्मिक गोष्टीकडे लक्ष केंद्रित कराल. तसेच सामाजिक कार्यात भाग घ्याल. त्यामुळे आपण आनंदी राहाल.त्यातून मानसिक समाधान लाभेल.या काळात नातेवाईक व शेजारी यांच्या शी संबंध बिघडतील. या काळात आपणास कानाची दुखणी जाणवतील.शेयरमार्केट मद्ये गुंतवणूक नुकसान कारक राहील.
धनु-हा सप्ताह आपणास प्रकुर्ती संबधी प्रतिकूल राहील.डोकेदुखी चा त्रास होऊ शकतो. तसेच या काळात वाहन जपून चालवावे.नोकरिव्यवसायत असणाऱ्यांना आर्थिक बाबतीत मध्यम काल. या काळात मात्र मित्रांचे सहकार्य लाभेल.त्यातूनफायदा होईल. महिलांना नवीन काही शिकण्याची संधी मिळेल.या काळात प्रॉपर्टी संबंधी कामे रेगाळतील.
वृश्चिक-या काळात आपल्या कुटूंबातील वातावरण विस्फोट राहील.त्यामुळे या काळात आपण शांत राहिले तर उत्तम .या काळात आपण पैसे जपून खर्च करावे.नकोते खर्च या काळात डोके वर काढतील.डोळ्यांना उष्णतेचे त्रास जाणवतील.महिलांनी या काळात घरातील वयस्कर लोकांची काळजी घ्यावि.
कुंभ-या काळात नको त्या जबाबदाऱ्या वाढतील.विवाह योग्य मुलामुलींचे विवाह जुळण्याचे योग येतील.किंवा त्यासंबंधी बोलणी यशस्वी होतील.धार्मिक कार्यासाठी प्रवास घडेल.एखाद्या तीर्थक्षेत्रास भेट द्याल.व्यावसाईकांना प्रवास लाभ दायक होतील. जुनियेणी वसूल होतील.
मकर-हा सप्ताह आपणास चांगला राहील. कविलेखक याना आपल्या कला दाखवण्याची संधी उपलब्ध होईल.मात्र कुटूंबिक बाबतीत मात्र अस्थिरता राहील. काही अपवाद वगळता इतर बाबतीत सप्ताह बरा राहील.महिलांना दागिने खरेदी चे योग येतील.नोकरीव्यावसाईक यांना आर्थिक बाबतीत चांगला काळ काही धन लाभाचे योग्य येतील.या काळात आपण प्रकुर्तीची काळजी घ्यावी.
मीन-या काळात आपण विचारपुर्वक वागावे. आपल्या वागण्यामुळे इतरांचे मन दुखवले जाणार नाही याची काळजी घ्यावी. वैवाहिक जोडीदाराबरोबर वाद होतील. या काळात मात्र आपणाला संतती सबंधी चांगली बातमी मिळेल.आपण पुर्वीकेलेंली गुंतवणूक फायद्याची राहील.महिलांना मध्यम असा सप्ताह राहील.
, जोतिष
उषा सुभेदार
कोरेगल्ली, शहापूर,
बेळगाव