आजचा दिवस काँग्रेस आणि भाजप मधील इच्छूक उमेदवारांच्या दृष्टीने अतिशय हुरहुरीचा आहे. कारण आज हे दोन्ही पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आज दुपारी तीन नंतर काँग्रेस पक्ष आपली उमेदवार यादी जाहीर करणार आहे. तर त्यानंतर संध्याकाळ पर्यंत भाजपची यादी जाहीर होणार आहे.
बेळगाव आणि परिसरात उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर व निपाणी हे मतदारसंघ महत्वाचे आहेत. यामुळे याठिकाणी काँग्रेस व भाजपचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू आहे.
जेडीएस तर्फेही उमेदवार निवडीचे काम जोरात सुरू असून उद्या किंवा परवा त्यांचीही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे इच्छूक उमेदवारांची हुरहूर वाढत आहे.
Trending Now