खानापूर समितीतील निवडीवरून सुरु असलेल्या वादात अखेर पुन्हा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरन समितीने उडी घेतली आहे आणि सीमा भागाचे जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्या मध्यस्थीने खानापुरातील उमेदवार बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खानापूर समितीच्या दोन्ही गटातील नेत्यांना मध्यवर्ती समितीने रविवारी दुपारी पाचारण केले होते त्यातील आमदार अरविंद पाटलांच्या नेतृत्वाखालील २७ कार्यकारिणीच्या सदस्या सह अरविंद पाटील यांनी जेष्ठ नेते एन डी पाटील यांची बेळगावातील एका हॉटेल मध्ये भेट घेतली अन विलास बेळगावकर यांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली. निवडीसाठी ४० सदस्यांची समिती केली असताना केवळ पाच जणांच्या समितीने बेळगावकर यांची निवड घोषित केली यावर आक्षेप नोंदवण्यात आला. खानापूर समितीचे अध्यक्ष विलास बेळगावकर यांच्या कडे १३ कार्यकारिणीचे सदस्य असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मध्यवर्तीने दोन्ही गटांना बोलावले होते त्यापैकी अरविंद पाटील यांनी आपल्या २७ सदस्यां सह परेड केली मात्र विलास बेळगावकर यांचा गट दुपार पर्यंत तरी हजर झाला नव्हता त्यामुळे आमदार अरविंद पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही. दुपारी चार वाजता जेष्ठ नेते एन डी पाटील पत्रकार परिषद घेऊन याबबत घोषणा करण्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
Trending Now