काल निवड समितीच्या बैठकीत जो प्रकार झाला तो सीमा भागातल्या कोणत्याही मराठी माणसाला आवडलेला नसणार,कालच्या प्रकारा वरून कुकर वाटणाऱ्या आक्काचे साडी आणि वाटणाऱ्या दादांच्या समर्थकांनी फटाके वाजवले असतील कारण समितीतला सावळा गोंधळाची मालिका तिसऱ्या टर्म मध्ये पुढेच सुरु आहे.
न गेली दहा वर्ष ग्रामीण मतदार संघावर बाहेरून(कोल्हापूरच्या)आलेल्या उमेदवाराला मराठी जणांतील आपापसातील भांडणाचा फायदा मिळाला होता त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून समिती नेत्यांनी डॅमेज कंट्रोल करायला हवा यासाठी महाराष्ट्रातून प्रयत्न झाले पाहिजेत.
तालुका समिती असोत किंवा खानापूर समिती असो दोन गटातील संघर्ष शिगेला पोचला आहे उमेदवारी वरून एन डी समितीतील गटातील महत्वाचे नेते नाराज आहेत त्यांची मनधरणी करणे या गटातील नेत्यां समोर तारेवरची कसरत असणार आहे. राहिली अष्टेकर-पावशे-बी आय गटाची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे मात्र निवड प्रक्रिया बैठकीत जे झालं ते बेळगावातल्या सामान्य मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे.
सध्या स्थितीत निवड प्रक्रियेतून माजी आमदार मनोहर किणेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे आगामी दोन दिवसात मध्यवर्ती समिती याची घोषणा देखील करेल मात्र एस एल चौगुले,सरस्वती पाटील आणि रामचंद्र मोद्गेकर यांच्या नाराजीचे काय?हा प्रश्न तालुक्यातील अनेकांना सतावू लागला आहे. ओरिएंटल बैठकीतील नाराजी मुळे तालुक्यात दिग्गज मानले गेलेले माजी आमदार पावशे-अष्टेकर- बी आय या तिघांचे समर्थक देखील एकत्र येऊन रणनीती आखतात की काय अशी देखील परिस्थिती निर्माण होत आहे याचा नेत्यांनी विचार विनिमय करणे गरज आहे अन सुवर्ण मध्य साधून समितीतील बेकीच वादळ शमवण्याची गरज निर्माण झाली आहे.
कालच्या बैठकी नंतर पावशे-अष्टेकर- बी आय या तिन्ही माजी आमदार समर्थक एक होण्याचे संकेत देखील मिळत आहेत एकूणच एकी राहावी मराठी एकजुटता टिकावी अन समितीचा झेंडा फडकावा अशी हळहळ भावना मराठी प्रेमी जनता व्यक्त करत आहे.