गेले काही महिने खानापूर समितीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली असून विध्यमान आमदार अरविंद पाटील हे निवड प्रक्रियेवर नाराज आहेत.खानापुर समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी विलास बेळगावकर यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे खानापुरात देखील अंतर्गत धुसफूस वाढली आहे.
निवड समितीच्या बैठकीत अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी ही निवड जाहीर केली आहे. खानापूर तालुका समितीच्या वतीन एकूण ३७ सदस्यांची समिती केली होती मात्र पाच सदस्यीय समितीने ही निवड केली आहे असा आक्षेप देखील घेण्यात येत आहे आणि सदर निवड प्रक्रिया योग्य नसल्याचा आरोप आमदार अरविंद पाटील गटाने केला आहे. या प्रकरणी ते लवकरच मजी अर्थ मंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत .