एका चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या ब्रेव्हो निखिल दयानंद जितुरी याला त्याच्याच डान्स ग्रुपने गौरविले आहे. तुझा आम्हाला अभिमान वाटतो अशा शब्दात त्याला सन्मानित करण्यात आले आहे.
डान्स मास्टर रवी शेट यांच्या फिनिक्स डी प्लॅनेट या ग्रुपचा तो सदस्य आहे. शनिवारी त्याने जे धाडस दाखवले त्याची माहिती सर्वप्रथम बेळगाव live ने प्रकाशात आणली. त्यानंतर लगेचच त्याच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.
निखिल त्याच्या ग्रुपसाठी अभिमानाचा विषय ठरला, लगेचच त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यासमोर गौरवण्यात आले.