तालुका निवड समितीच्या बैठकी दरम्यान निवड प्रक्रियेवर आक्षेप घेत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील अध्यक्ष निन्गोजी हुद्दार आणि सरचिणीस एल आय पाटील यांच्यावर चांगल्याच भडकल्या होत्या. ओरिएटल शाळेत झालेल्या निवड समिती सदस्यांच्या बैठकीची कल्पना देखील मला नव्हती अस बेजाबदार पणाचे वक्तव्य अध्यक्ष हुद्दार यांनी केल्यावर संतापलेल्या पाटील यांचा राग अनावर झाला होता.
‘आम्ही कुठल्या बाईचे पैसे वाटले नाहीत स्वताच्या हातानी समितीसाठी पैसे खर्च केलेत’ असा आरोप करत त्या भलत्याच संतापल्या होत्या. सर्वसाधारण बैठकीत १०१ सदस्यांची निवड कार्यकारणी करायची मागील निवडणुकीत पडलेल्या मतदाना प्रमाणे ५०० मताला १ सदस्य, १००० मताला दोन सदस्य तर १५०० मताला तीन सदस्य असा निर्णय झाला होता मात्र अचानक पणे युवा आघाडीचे १२, जिल्हा पंचायत सदस्य दोन,ए पी एम सी ३,११ तालुका पंचायत ९ महिला आघाडी असे एकूण ३७ सदस्य अचानक वाढवण्यात आले असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
एकूणच तालुका समितीतील वादा मुळे निवड प्रक्रिया वादाचा भोवऱ्यात अडकली आहे.