मिशा वर हात फिरवत चामुंडेश्वरी मतदार संघातून निवडणूक लढवणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जनतेच्या रोषाला घाबरत मैसूर हून आपला मतदार संघ बदलून दुसरा मतदार संघाच्या शोधात आहेत असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे.
शुक्रवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे संगोळळी रायणणा मूर्तीला हार अर्पण केल्यावर पत्रकारांशी बोलताना लगावला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदार संघातल्या लोकांना घाबरे आहेत त्यामुळेच ते उत्तर कर्नाटकातील मतदार संघ शोधत आहेत असे देखील शाह म्हणाले. सत्तेवर असलेल्या सिद्धरामय्यावर गेल्या पाच वर्षात जनतेने असमाधान व्यक्त करत मी प्रवास केलेल्या कर्नाटकातील भागात मुख्यमंत्र्याबद्दल जनतेत रोष तर बी एस येडीयुराप्पा वर प्रेम आदर आहे अस देखील त्यांनी स्पष्ट केल.
ते पुढे म्हणाले की राज्यातील जनताच भाजपला जिंकवण्याचा संदेश देत आहे यावेळी प्रचंड बहुमताने राज्यातील जनता भाजपला पुन्हा सत्तेवर आणणार आहे मोदी आणि येदियुराप्पा यांच्या हातूनच कर्नाटक विकासाच्या पथावर जाणार आहे . जीवनात पहिल्यांदाच मी कित्तूर ला आलोय १९५७ च्या स्वातंत्र्य युद्धात योगदान दिलेल्या वीर नारीने दिलेल्या बलिदान त्याग हा इतिहासच आहे अस ही ते म्हणाले.भाजप खासदार सुरेश अंगडी,प्रह्लाद जोशी आदी यावेळी उपस्थित होते.