कर्नाटकातील विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात १२ मे रोजी होणार आहे. आता निवडणुकीस फक्त एक महिना शिल्लक राहिला आहे. यामुळे लवकरच राजकीय गरमीचे वातावरण अनुभवावयास मिळणार आहे.
१७ एप्रिल पासून २४ एप्रिल पर्यंत निवडणूक अर्ज भरता येणार आहेत, याकाळात उमेदवारी म्हणजेच बी फॉर्म मिळवण्यावरून चढाओढ असणार आहे.२५ एप्रिल ला होणार अर्जाची छाननी होऊन चुका आढळलेले किंवा चुकीची माहिती दिलेले उमेदवार निवडणूक प्रक्रियेतून गाडले जाणार आहेत.
अर्ज माघारीची मुदत २७ एप्रिल आहे. बंडखोरी किंवा डमी उमेदवारी भरलेल्यांना यातून माघार घ्यावी लागेल,
१२ मे रोजी मतदान होणार असून या दिवशी उमेदवारांचे भवितव्य मतदार यंत्रात कैद होणार आहे. त्यानंतरचे दोन दिवस प्रचंड हुरहुरीचे जाणार आहेत.
१५ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील आमदार कोण हे कळण्यास आता एक महिना आणि तीन दिवस वाट बघावी लागेल.
राज्यभरात ५६६९६ मतदान केंद्रे आहेत, सध्या २७ मार्चपासून आचार संहिता जारी करण्यात आली असून आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.