विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येईल तसतसे उमेदवारांना आकर्षित करण्यासाठीचे प्रयत्न जोरात आहेत. या प्रयत्नामागे आपण निवडून येण्याची महत्वाकांक्षा दिसत आहे. भेटवस्तू वाटून मतदारांचे लक्ष वेधत असताना जागृत मतदारांनी विरोध केल्याच्या घटनाही घडताहेत.
एक महिला उमेदवाराने कुकर वाटले त्यापैकी एक कुकरचा स्फोट झाला आणि ते कुकर घेतलेल्या इतर मतदारांच्या मनात धास्ती निर्माण झाली. हे कुकर नव्हे तर बॉम्ब असा समजही पसरला त्यामुळे महिला ते कुकर गॅस वर ठेवण्यापूर्वी शंभर वेळ विचार करू लागल्या.
पुढे साडी आणि इस्त्री वाटली जात असतांना ते खरेदी करायची तुमची लायकी नाही काय असा प्रश्न मराठी जनतेने विचारला यामुळे घेण्याचा मोह असला तरी कोणी बघणार तर नाहीत ना असा विचार करून चोरून चोरून या भेटवस्तू घेऊन जाण्याची वेळ मतदारांवर आली.
आणखी एका ठिकाणी पॅडमॅन व्हायला गेला आणि शिव्या खाऊन आला अशी वेळ एक उमेदवारांवर आली. गरीब वस्तीत महिलांना एकत्र करून सॅनिटरी पॅड देण्याचा प्रकार भलताच अंगलट आला. महिलांनी हे खरेदी करायची आमची लायकी आहे तुम्ही देण्याची गरज नाही, आमचे घरचे लोक यासाठी आम्हाला पैसे देतात असे सांगितल्याने त्या व्यक्तीला परत फिरावे लागले.
अजूनही अनेक जण अनेक मार्ग सुरू करून जनतेला खुश करायचे प्रयत्न करत आहेत, पण जनता शहाणी आहे हेच खरे.