भरधाव वेगाने जात असलेल्या आय 20 कारने रस्त्या शेजारील झाडाला दिलेल्या धडकेत मैसूरू येथील तीन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.सोमवारी सायंकाळी सहा च्या दरम्यान हा अपघात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याहून कित्तुर मार्गे सदर युवक आय-20 कार मधून बंगळुरू कडे जात होते कित्तुर जवळील देगुरहळळी गावा जवळ हा अपघात घडला आहे. कित्तुर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात हा अपघात घडला आहे. रघुनाथ वय 25 रा.बंगळुरू, सुधींद्र गौडा वय 25 रा. बेळकेरी होसनुरू , मल्लिकार्जुन वय 25 रा.मंडया अशी मयतांची नाव आहेत.
चालक व अन्य एकजण जखमी झाले आहेत.