शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दक्षिण मतदार संघात सोमवारी तिघांनी रंगुबाई पॅलेस मध्ये आपले अर्ज सादर केले आहेत यात ए पी एम सी चे माजी अध्यक्ष मनोहर होसुरकर, नगरसेवक विनायक गुंजटकर आणि अड भारत जाधव यांनी अर्ज इच्छुक असल्याचे भरले आहेत.
रिझ मध्ये देखील वाढले अर्ज
उत्तर मतदार संघात रिझ थिएटर मध्ये सोमवारी तिघांनी अर्ज दाखल केले आहेत चंद्रकांत गुंडकल यांनी हे अर्ज स्वीकार केलेत.
संजय मोरे,नारायण किटवाडकर आणि संतोष बसवंत चव्हाण यांनी इच्छुक असल्याचे अर्ज दाखल केले आहेत. दक्षिण मतदार संघात नेताजी मनगुतकर आणि शिवाजी हंडे यांनी देखील अर्ज दिला आहे