मतदारांना राष्ट्रीय पक्ष वेगवेगळी आमिष दाखवत असताना दक्षिण मतदार संघात रोख रक्कम देऊन मतदाराकडून ओळखपत्रे आणि आधारकार्ड देखील एकत्रित केली जात आहेत.
दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या ग्रामीण भागात ‘विथ द डिफरन्स’ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला एक हजार रुपये रोख देऊन मतदाराकडून आधार ओळखपत्र घेण्यात येत आहे. ही ओळख पत्रे नेमकं कश्या साठी घेताहेत का घेताहेत याबाबत तपशील मिळाला नसला तरी जागरूक मतदारांनी स्वताची ओळख पत्रे आधार देऊ नये अशी देखील चर्चा होत आहे.
मराठी विरोधी नसल्याचा स्पष्टीकरण
ग्रामीण भागातील मराठी लोक प्रतिनिधींना राष्ट्रीय पक्षात नेऊन त्यांना देखील कन्नड भाषिक करू असे वक्तव्य करणाऱ्या महिला नेत्याकडून मी तसं वक्तव्य केले नाही असं सांगावे लागत आहे.
त्या नेत्याचा जुना व्हीडिओ सोशल मीडिया वर वायरल झाला होता त्या व्हिडिओत सदर महिला नेत्यांनी मराठी भाषिकांना डिवचत मराठीना कन्नड करत असल्याचे वक्तव्य केलं होतं त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर हा व्हीडिओ वायरल झाल्याने पाया खालची वाळू सरकल्याने त्या महिलेने महाराष्ट्राच्या हद्दीत जेवणावळी देऊन सांगण्याची पाळी येत आहे.
रविवारी शिनोळी जवळ महाराष्ट्राच्या सीमेत 17 बकऱ्यांचा बळी देऊन टेम्पो टेम्पो भरून मतदारांना तिथं नेऊन जेवण देण्यात आले आहे. अमिष दाखवत देवीच्या मंदिरा समोर शपथी घेऊन मतदारांना भुलवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
समितीची बाजू हळूहळू वरचढ झाल्याने राष्ट्रीय पक्षांनी वेगवेगळ्या भूलथापा देण्याच्या क्लुप्त्या लढवल्याआहेत वेळीचं निवडणूक आयोगाने अश्या कृतीवर नियंत्रण आणावे अशी मागणी केली जात आहे.