पहिला एकी मग उमेदवार निवड अशी अट घालून एक गटातील ६५ व दुसऱ्या गटातील ३५ टक्के जणांना कार्यकारिणी आणि निवड समितीत सहभाग द्यावा अशी मागणी करून ग्रामीण भागातील एकीचे गणित सुरू आहे, दुसऱ्या गटाने ७५ व २५ असे समीकरण समोर ठेवले आहे यामुळे एकीचा वाद टक्केवारीत अडकला आहे.
दोन्ही गटातील प्रमुख व्यक्तींची बैठक झाली आहे. या बैठकीत कुणाला किती महत्व यावर जोरदार चर्चा झाली पण एकमत होऊ शकलेले नाही. एकाच उमेदवाराची निवड करून त्याला निवडून देण्यासाठी ही एकि महत्वाची असून त्यासाठी लवकरात लवकर एकमत व्हावे ही गरज आहे.
ग्रामीण भागात एकि व्हावी यासाठी बेळगाव live ने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी समिती नेत्यांनी योग्य प्रतिसाद द्यावा ही गरज आहे.
Trending Now