बेळगाव विमानतळाला कुलूप लावण्याची वेळ आली आहे. स्पाईस जेट कंपनीने चालवलेल्या सर्व विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घोषित केला आहे.
या सर्व सेवा हुबळी विमानतळावर हलवण्यात येणार आहेत, यामुळे बेळगाव विमानतळावरून एकही विमान उडणार नाही. स्पाईस जेट कम्पनीने पुन्हा एकदा बेळगावकरांचा भ्रम निरास केला आहे
१४ मे पासून बेळगाव वरून सुरू असणाऱ्या सर्व विमानसेवा हुबळी विमानतळावरून सुरू राहतील असे जाहीर करण्यात आले आहे. ८ एप्रिल पासून मुंबईला जाणारे विमानही बंद करण्यात आले आहे.
बेळगाव हुन प्रवासी संख्या वाढली असतानाही हा निर्णय घेण्यात येत असल्याने पुन्हा विमानतळ ओस पडणार आहे.
धावपट्टीचे रुंदीकरण, नवी टर्मिनल बिल्डिंग आणि विस्तारीकरण करून पुन्हा अशी अवस्था झाल्यास राजकीय व्यक्तींचे अपयश म्हणावे लागेल, पण असे होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत.