खानापूर तालुका मतदारसंघातील समितीचा उमेदवार प्रा एन डी पाटील ठरवणार आहेत. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ३७ जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली असून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
खानापूर समितीत काही दिवसांपासून वाद सुरू होता. दिगंबर पाटील यांचे अध्यक्षपद मान्य नाही असे सांगून आमदार अरविंद पाटील यांनी विरोध सुरू केला होता. तर अरविंद पाटील यांना यावेळी उमेदवारी नको अशी मागणी वाढली होती.
यासंदर्भात मध्यवर्ती समितीकडे वाद आल्यानंतर प्रा भाई एन डी पाटील यांनी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि राजाभाऊ पाटील यांच्यावर निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
आता उमेदवार निवड समिती नेमून उमेदवार ठरवला जाणार असून तो एन डी पाटील जाहीर करणार आहेत. दिगंम्बर पाटील यांच्या नेतृत्वात 8 एप्रिल ते 11 एप्रिल पर्यंत उमेदवार अर्ज मागवण्यात आले आहेत अर्ज आल्यावर एन डी पाटील यांच्या नेतृत्वात निवड समिती तयार करून उमेदवार निवडण्यात येणार आहे.
विध्यमान आमदार अरविंद पाटील यांनाच उमेदवारी द्यावी या मागणीवर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही, यामुळे इतर इच्छूक उमेदवारांचीही पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेमुळे इतर इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.