उद्योजक व चित्रपट वितरक महेश कुगजी यांना जेडीएस पक्षाचे बेळगाव दक्षिणचे तिकीट कन्फर्म झाले असल्याची बातमी आली आहे.
काँग्रेस पक्षाला रामराम करून ते सोमवारी जेडीएस मध्ये प्रवेश करणार आहेत. आपले कार्यकर्ते घेऊन जेडीएस च्या विस्तारासाठी प्रयत्न करण्याची अट त्यांना असणार आहे.
यंदा नवा आणि मराठी चेहरा देण्याचा निर्णय जेडीएस ने घेतला आहे. भाजप व काँग्रेस पक्षातील भांडणाचा फायदा घेऊन आपला पक्ष निवडून आणण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असे समजत आहे.
सोमवारी तिकिटाची घोषणा अधिकृतपणे केली जाईल, मराठी तसेच सर्वभाषिक मतांच्या जोरावर ही सीट निवडून येईल असा विश्वास पक्षाचे वरिष्ठ मांडत आहेत.