Monday, January 6, 2025

/

मागील वेळी एकीसाठी प्रयत्नशील आप्पासाहेब गुरव यावेळी इच्छुक

 belgaum

म ए समितीच्या माध्यमातून बेळगाव दक्षिण मतदार संघात निवडणूक लढविण्यास आपण इच्छूक आहे. समितीने आपणास उमेदवारी द्यावी अशी मागणी करत आहे.

gurav appasaheb

लहानपणा पासूनच आपण समितीच्या कार्यात आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा कधीच केली नाही.लायन्स क्लब ऑफ बेळगाव च्या माध्यमातून तसेच सुभाषचंद्र नगर नागरिक संघटनाच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आलो आहे.मराठा मंदिर, मराठा युवक संघ या संस्थांमध्येही काम करत आहे. याव्यतिरिक्त काही गरजू मुलांना वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावलेला आहे अशी माहिती त्यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.

बेळगाव मध्ये होळीमध्ये पोळी घालण्याची प्रथा बंद करण्यात आपला मोठा सहभाग आहे. हीच पोळी अनाथाश्रमात वाटण्याचा उपक्रम आपण राबविला. या कामांच्या जोरावर तसेच जनसंपर्क च्या माध्यमातून विजयश्री आणण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.आपण व्यावसायिक असलो तरी संपूर्ण आयुष्य सिमप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी घालवीत राहीन अशी देखील भूमिका त्यांनी मांडली आहे.

आज सर्वजण एकीच्या संदर्भात बोलत आहेत. सर्वप्रथम पाच वर्षांपूर्वी संभाजी पाटील निवडून आले त्यावेळी एकीचा सूत्रधार मीच होतो, किरण ठाकूर साहेबांशी पहिली बैठक मीच करून सुरेश हुंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पाडली होती. त्यामुळेच वातावरण चांगलं होऊन समितीला पोषक असे संभाजी पाटील निवडून आले असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले  की आज उधमबाग आणि परिसरात अनेक समस्या आहेत. कारखानदारीला प्रतिनिधित्व देण्यासाठी कुठल्याही आमदार व खासदाराने प्रयत्न केले नाहीत.माझा या क्षेत्राशी असल्याने व चेंबर ऑफ कॉमर्स आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री संघटनेत काम केल्याने सामान्य जनते बरोबरच कारखानदारीच्या हितासाठी नक्कीच प्रयत्न करेन.यापूर्वी कारखानदारांचा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो आहे.अनेक ठिकाणी अपघातात मदतीचे काम केले आहे. तिसरे गेट ते पिरनवाडी पर्यंत रस्ता रुंद व्हावा म्हणून बरेचसे प्रयत्न केले आहेत, त्याची फळे आज मिळाली आहेत. यासाठी रास्तारोको केल्याच्या केसीस माझ्या अंगावर आहेत ते लवकरच समितीकडे रितसर अर्ज देखील दाखल करणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.