तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा पावशे अष्टेकर गट एकी साठी प्रयत्नशील असून निरोपाच्या प्रतीक्षेत आहे अशी माहिती अध्यक्ष म्हात्रू झंगरुचे, सरचिटणीस मनोज पावशे आणि कार्याध्यक्ष वाय बी चौगुले यांनी संयुक्तरित्या दिली आहे.
माजी आमदार मनोहर किणेकर आमच्या संपर्कात आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसह एकदा आमची बैठक झाली आहे ते लवकरच निरोप देणार आहेत आम्ही त्यांच्या निरोपाच्या प्रतीक्षेत आहोत एकीसाठी आम्ही कधीही तयार आहोत से देखील त्यांनी स्पष्ट केल आहे.
निवडणुकीत एकी व्हावी ही आमच्या गटाची देखील भावना आहे मात्र आमच्या गटाशी चर्चा करून आम्हाल देखील सामावून घ्या अशी मागणी आम्ही केली आहे अस देखील ते म्हणाले.