सीमाप्रश्नाची साठी उलटली आणि समिती नेत्यांचीही साठी उलटून गेली आहे. साठी म्हणजे बुद्धी नाठी या म्हणीप्रमाणे काम नको , आम्हाला एकि पाहिजे आहे आणि हवे तर मतदार संघ वाटून घ्या पण समितीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणा ही भावना आहे, पिरनवाडी ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्ष गीता बस्तवाडकर यांची.
बेळगाव live शी संपर्क साधून त्यांनी ही भावना मांडली. समिती नेत्यांनी एकत्र यावे, पाहिजे तर चिठ्या काढाव्या आणि एक लहान मुलाला बोलावून घेऊन त्या उचलायला लावाव्यात. ज्याला जो मतदारसंघ येईल त्याने तो वाटून घ्यावा आणि तेथे समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असा त्यांचा सल्ला आहे.दीपक दळवी आणि किरण ठाकूर यांनी हा निर्णय घ्यावा असे त्यांचे मत आहे.
बेकीने आजपर्यंत मोठं नुकसान झालं आहे. तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या जागा गेल्या आहेत. सगळीकडे आपणच मोठे म्हणत बसण्यापेक्षा विभाजन करून एकाने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप न करता समितीच्या विजयाकडे या नेत्यांनी लक्ष दिले तर बरे होईल असे त्यांनी सांगितले.