नुकतेच या देशातील दोन महत्वाच्या व्यक्ती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व शिवसेनेचे खासदार संजय राउत, बेळगाव मध्ये येवून गेले व विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाचे लक्ष बेळगाव भागावर केंद्रित झाले.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा विजय जास्तीत जास्त मतदार संघात होणे हा त्यामागचा उद्देश आहे यात तिळमात्र शंका नाही. हा सर्व घडामोडी एकाबाजूला घडत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार कोण याकडे बेळगाव जिल्ह्याचे आणि समस्त सीमावासीय मराठी जनेतेचे आहे. कारण अध्याप हे चित्र म्हणावे तसे स्पष्ट झाले नाही. त्यातच समिती मध्ये असणाऱ्या दोन गटांमध्ये एकी होऊन एकच उमेदवार आल्यास विजय निश्चित अशी काहीशी प्रतिमा सध्या सिमाभागात तयार झाल्याने सगळ्यांची उत्सुकता उमेदवार कोण याकडे लागली आहे.
बेळगाव उत्तर,दक्षिण, ग्रामीण तसेच खानापूर आणि निपाणी या पाचही मतदार संघात समितीचे उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. पण शेवटी समितीच्या अंतर्गत राजकारणात सरशी होते कि ,हेवेदावेंच्या राजकारणात मतांची विभागणी होते हे येणारा काळच ठरवेल. बेळगाव शहर व ग्रामीण भागात कोण निवडून येणार यावर संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे या विस्तारित राजकारण आधारित पहिल्या लेखात आपण जिल्ह्याच्या राजकीय समीकरणावर दृष्टीक्षेप टाकणार आहोत. जस सुरवातीलाच लिहल आहे कि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकंदर राजकारणावर इतरांची गणिते इथे तयार होतात असे आत्तापर्यंतच्या निवडणुकात दिसून आले आहे. तसे इतर पक्षांचे काही उमेदवार जरी निश्चित झाले असले तरी उमेदवारांची निवड होताना राजकीय पक्ष्य जात ,धर्म या साल्या गोष्टींचा विचार करतात.त्यामुळे मराठा, लिंगायत, मुस्लीम, ब्राम्हण,दलित ,जैन अश्या सगळ्यांचा विचार करून उमेदवार ठरतील हे हि महत्वाचे. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्ष करत असतात त्यामुळे एकच भागात दोन एकाच समुदायाच्या लोकांना उमेदवारी मिळेल का ? याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. बेळगाव शहर जिल्हाकेंद्र असल्याने कायमच इथल्या कानडी लोकप्रतीनिधिनी वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि आजही करत आहेत. गेल्या काही वर्षात सतीश जारकीहोळी आणि बंधू व उमेश कत्ती यांचे जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यासाठी चढा ओढ सुरु आहे. त्यात ३ खासदारांची भूमिकाही तितकीच महत्वाची. बेळगाव व चिकोडीचे दोन लोकसभा खासदार व एक राज्यसभा खासदार. यात सातत्याने प्रभाकर कोरे यांनी आपली मक्तेदारी राज्यसभेच्या जागेवर ठेवली आहे. हा झाला भाग लोकसभेचा पण मुळ जिल्हा व राज्याच्या राजकारणाचा प्रश्न येतो तेव्हा जारकीहोळी व कत्ती यांच्यात वर्चस्वासाठी रस्सीखेच कायमच बेळगाव जिल्ह्यात पाहायला मिळते कारण कत्ती भाजप शी सलग्न आहेत व जारकीहोळी कॉंग्रेस. या वेळी कर्नाटकात भाजप ,कॉंग्रेस आणि जेडीएस यांच्या त्रिशंकू लढाई आहे. बेळगाव जिल्ह्यात म्हणावे तसे जेडीएस ला महत्व नाही त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात हि सरळ लढत आहे. त्या अनुशंघाने दोन्ही पक्ष्यांचे इथले उमेदवार कोण यावर सगळ्यांची नजर आहे . जारकीहोळी बंधूंना आपल्या विजयाची हमी असली तरी जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांचा सर्वतोपरी प्रयत्न असणार हे निर्विवाद सत्य. बेळगाव जिल्ह्यामध्ये या आधी त्यांना वरचढ होणारं कोण नसली तरी यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांना त्यांच्या पक्ष्याचे बेळगाव उत्तरचे उमेदवार फिरोज सेठ आणि बेळगाव ग्रामीणच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बलकर यांचे आव्हान आहे. कारण यांचा विजय हा जिल्ह्याची समीकरणे बदलणारा ठरेल यात शंका नाही .तसे झाले तर ते जारकीहोळी बंधूंच्या सत्ता समीकरणांना बाधक ठरणार. लक्ष्मी हेब्बलकर या राज्य महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा असल्याने त्यांचा त्यांच्या भागातील विजय त्यांना थेट राज्याच्या राजकारणात महत्वाच्या पदावर पोहचवेल यात शंका नाही. तशीच काहीशी गत बेळगाव उत्तरचे विधमान आमदार व कॉंग्रेसचे या निवडणुकीचे उमेदवार फिरोज सेठ यांच्या बाबतीत हि आहे. कारण अल्पसंख्यांक म्हणून ते असताना देखील दोनदा विजयी आहेत व आत्ता तिसऱ्या विजयासाठी आतुर असल्याने त्यांचा विजय हा जारकीहोळी बंधूना पुन्हा धक्का देवू शकतो याचा विचार बाजूला सारता येत नाही. अश्याच काहीश्या पेच प्रसंगात भाजप असून बेळगाव दक्षिणचे माजी आमदार अभय पाटील यांचा वरचष्मा होवू शकतो जर त्यांचा विजय झाला तर .पण त्यांना पक्ष्याचे तिकीट मिळणार का हा देखील प्रश्न आहे., कारण शेवटी राज्यातील असो किंवा जिल्ह्यातील राजकीय पोवार हाती ठेवायची असेल तर सत्ताधीशांना आपल्यापेक्षा कमी ताकदीचे किंवा मान डोलवणारे प्रतिनिधी हातात पाहिजे असतात. त्यामुळे सामान्य जनता ज्याला उमेदवार म्हणून बघत असते त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा पक्ष श्रेष्ठींचा वेगळा असतो. आता या सगळ्या परिस्थिती महाराष्ट्र एकीकरण समितीला आणि इथल्या सामान्य मराठी माणसाला पूरक असल्याने या सगळ्यातून समितीचे नेतृत्व कशी वाट काढते हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल.
शेवटी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निवडताना या सारासार गोष्टींचा विचार होणे जास्त महत्वाचे आहे. हि र्ज्कीय समीकरणे सामान्य जनतेच्या डोक्यात जाने तशी कठीण पण राजकीय पटल पसरून बसणाऱ्या लोकांच्या डोक्यात नक्की जातील .हा एकंदर वरवरचा जरी लेख असला तरी लवकरच विभ्गावर लिखाण करण्याचा प्रयत्न करेन.
लेखन – पियुष हावळ
बेळगाव