अरगन तलावातील माती उपसा करण्याचे काम सुरू आहे. ही माती कोणीही घेऊन जाऊ शकतात. ही सुपीक माती आहे ज्या कोणाला ही माती हवी आहे त्यांनी घेऊन जावे असे आवाहन मराठा सेंटरचे ब्रेगेडियर गोविंद कलवड यांनी केलं आहे.
तलाव जवळ काम करत असणाऱ्या लष्करी जवानांशी संपर्क साधून स्वतःचा जेसीबी असेल तरीही त्यांनी उपसा क्रम येऊन घेऊन जाऊ शकतात.ब्रिटिश काळापासून आजवर येथील माती कधीच काढली नाही आता काढली जात आहे अशी माहिती कलवड यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.
गरजुनी ट्रॅक्टर व कोणतेही साधन घेऊन येऊन घेऊन जावे असे आवाहन देखील ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी केले आहे.