Beळगाव शहर आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उष्म्यात वाढ होत असून नागरिकांना उकाडा त्रासदायक ठरत आहे.
गेले दोन दिवस सगळीकडे वातावरण ढगाळ आहे, यामुळे कधी ऊन तर कधी सावली अशी स्थिती आहे. दुपारच्या वेळी सूर्य डोक्यावर आल्यावर घामाच्या धारा वाहत आहेत.
दुपारनंतर सर्व रस्ते खुले असू लागले आहेत, शहराची रहदारी अजून नियंत्रणात येत नसल्याने नागरिकांना भर उन्हात ताटकळत बसावे लागत आहे.
दिवसभर आणि रात्रीही उकाडा या स्थितीने शहराला पावसाचे वेध लागले आहेत. पाण्याचा तुटवडाही भासू लागला असून जास्तीत जास्त पुढच्या महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध होईल अशी परिस्थिती आहे.