आचारसंहिता सुरू झाली, शरद पवारांची सभा झाली मात्र खानापूर समितीतला वाद शमवण्यात मध्यवर्ती समितीला यश आलेले नाही. सीमाप्रश्नाप्रमाणे मध्यवर्तीच्या कोर्टात गेलेल्या खानापूरच्या वादाचे घोंगडे भिजतंच पडलं आहे.
दिगंम्बर पाटील यांची समिती खरी की अरविंद पाटील यांची या दोघांतील संघर्षात हा वाद मध्यवर्तीच्या कोर्टात प्रलंबित आहे.शरद पवारांची सभा झाल्यावर जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्यासमोर बसवून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला मात्र मध्यवर्तीने पुन्हा एकदा तो सामना टाय केला आहे.
एकीकडे खानापूर तालुक्यात राष्ट्रीय पक्ष जोरात कामाला लागले असताना समितीत मात्र नेतृत्वावरून जुंपली आहे.मध्यवर्ती समितीच्या लोंबकळत्या धोरणामुळे खानापूर येथील मराठी जनतेची मनस्थिती द्विधा झाली आहे. एकी करा म्हणून खानापूर आमदारांनी मध्यवर्ती कडे साकडं घालुन चार महिने उलटले तरी देखील वाद मिटवण्यात अपयश आले आहे. यापूर्वी दोन बैठकातून चर्चा झाली तरी देखील अपयश आले आहे.
सध्या मध्यवर्तीत रंग बदलणार नेतृत्व आहे की काय अशी चर्चा होत आहे दोन गट कायम राहिल्यास खानापूरचा बालेकिल्ला ढासळणार अशी स्थिती निर्माण झाली आहे . नेत्यांचा अहंकार खपवून घेऊन काय साध्य केलं ही देखील चर्चा होत आहे.मंगळवारी होणाऱ्या मध्यवर्तीच्या बैठकीत याबाबत काय तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे
Trending Now