भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या समोर आत्मदहन करणार असा इशारा एका शेतकरी कुटुंबाने दिला आहे. उद्या शहा यांच्या दौऱ्याप्रसंगी संपूर्ण कुटुंब आत्महत्या करणार असल्याचा हा इशारा सद्या संपूर्ण कर्नाटकात खळबळ माजवत आहे.
बैलहोंगल येथील नागनूर गावच्या या शेतकरी कुटुंबाने या इशारा देऊन भाजपची हवाच काढली आहे. बेळगाव जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष बचनगौडा सिद्रमानी यांनी
फसवून जमीन घेऊन पैसे दिले नाही असा या कुटुंबाचा आरोप आहे.
संपूर्ण कुटुंबच भाजप विरोधात उभे राहिले असून हा पक्ष शेतकऱ्यांना लुटणारा आहे, या पक्षाला मतदान करू नका असा प्रचारही या कुटुंबाने सुरू केला आहे.
या प्रकरणी न्यायालयीन लढा सुरू असताना जमीन दुसऱ्याला विकण्याचा प्रयत्नही सुरू असून आता आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही असे या कुटुंबाने सांगितले. अमित शहा येथील तेंव्हा कित्तूर मध्ये सकाळी १० वाजता सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा पत्रकारांसमोर दिला आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या लोकांना जवळ केल्याचा फटका या पक्षाला जोरदार बसत आहे.