शनिवारी बेळगावात एक काँग्रेस महिला उमेदवाराच्या नावाची पोष्टर असलेला माल पकडण्यात आला होता. हा माल एकूण दीड कोटींचा असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती उघड केली आहे.
आचार संहिता लागू झालेली असतानाही मतदारांना वाटण्यासाठी हा माल घेऊन जात असताना छापा मारून ताब्यात घेण्यात आल्याने काल खळबळ माजली होती. त्यामध्ये कुकर, स्टो व इतर साहित्य होते.
कालपासून या मालाचे मूल्यमापन करण्यात आले असता १ कोटी ५६ लाख ३५ हजार ३०० रुपये मूल्य झाले आहे.
या मालाची वाहतूक करणारा वाहनही जप्त करण्यात आला आहे. हा आचार संहितेचा भंग असून पुढील तपास सुरू आहे.