?एप्रिल 1 ते 7 राशीफल?
?मेष-या सप्ताहात आपणाला मानसिक समाधान मिळेल कारण आपण हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण होतील.तसेच व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होतील.जुनियेणी वसूल होतील.कोर्टकचेरी कामात यश दायी सप्ताह मित्राचे सहकार्य लाभेल.मुलांना सहलीचा आनंद घेता येईल.महिलांना कुटूंबिक सौख्य लाभेल.घरात पाहुणे येतील घरातील वातावरण प्रसन्न राहील.
?वृषभ-हा सप्ताह आपणास मध्यम फल देणारा राहील. सप्ताहाच्या सुरवातीला महत्वाची कामे करून घ्यावी.नोकरीत असणार्याना अडचणींना तोंड द्यावे लागेल.व्यावसाई काना आर्थिक लाभ होतील.संतती बाबतीत काही शुभ घटना घडली. प्रकुर्तीत बिघाड होण्याची शक्यता आहे.महिलांनी या काळात वादविवाद पासून दूर राहावे.मुलांनी आपल्या वेळेचे योग्य नियमन करावे.काही गोष्टी वगळता सप्ताह बरा राहील.
?मिथुन-या सप्ताहात आपणास कुटूंबिक अडचणींना सामोरे जावे लागले. तसेच वैवाहिक जोडीदार बरोबर वादाचे प्रसंग येतील त्यामुळे आपण शांत राहावे.व्यवसाईकांना कामा निमित्ताने परदेशी जाण्याचे योग्य येतील.मुलांनी या काळात वाईट संगती पासून दूर राहावे. वेळेचा सद् उपयोग करावा.या काळात आपणास गुप्त शत्रू पासून त्रास होतील.महिलांनी या काळात बाहेर जातांना मूल्यवान वस्तू सांभाळा व्या.
?कर्क-हा सप्ताह आर्थिक बाबतीत चांगला असला तरी खर्च ही त्याप्रमाणे होईल.कुटूंबातील एखाद्या व्यक्ती आजारी पडल्यामुळे औषधउपचारा वर पैसे खर्च होतील कोर्टकचेरी कामात अडथळे येतील.या काळात वाहन जपून चालवावे.मुलांना प्रगती कारक सप्ताह राहील.महिलांना कामाचा ताण सहन करावा लागेल.
? सिंह-संततीविषयक आर्थिक समस्या त्रास देतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये नवीन संधी चालून येतील. जोडीदारा संदर्भात गोंधळाची स्थिती निर्माण होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासामधून अडचणी निर्माण होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल.
? कन्या-उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीविषयक शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणे कठीण आहे. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. वैयक्तिक दृष्टीने शुभ घटना घडतील. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल.
?तुला-हा सप्ताह आपणास मध्यम फल प्रद राहील.पराक्रमात वाढ होईल.मुलांकडून एखादि चांगली बातमी मिळेल.आपण पूर्वी एखाद्या कामा ची योजना आखली असेल तर ती आता पूर्ण होईल.व्यापारी वर्गातील लोकांना व्यापारात नफा होईल.कुटूंबिक खर्च मात्र वाढतील.नातेवाईकाबरोबर सहलीचा आनंद घ्याल.घरात आनंदाचे वातावरण राहील.
?वृश्चिक-या काळात त ब्येतिच्या तक्रारी जाणवतील.विद्यार्थी वर्गात करियर संबंधी विचारांना गती मिळेल.वाहन चालवताना सावकाश चालवावे.नोकरीत असणाऱ्या ना बदलीचे योग येतील.महिलांना या काळात जुन्या मेंत्रीनी भेटतील.विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्याची संधी मिळेल.
?धनु-या काळात धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.एखाद्या सामाजिक कार्यात स्वतःहून भाग घेतला जाईल त्यामुळे मनप्रसन्न राहील .कुटूंबाला वेळ दिला जाणार नाही त्यामुळे कुटूंबातील लोक आपणावर थोडे नाराज राहतील.व्यापारी वर्गाने आर्थिक व्यवहार या काळात जपून करावे.महिलांनी या काळात तब्येतिची काळजी घ्यावि.
?मकर-याकाळात नोकरीत असणाऱ्यांनी वरिष्ठ व्यक्ती शी चांगले संबंध प्रस्थापित केले तर त्याचा फायदा होईल. व्यापारी वर्गात या काळात काही आर्थिक संकटाना सामोरे जावे लागेल.कोर्ट कचेरीकामात अडथळे येतील.या काळात संयमाने वागावे लागेल.महिलांना सामाजिक कार्यात भाग घेता येईल.
?कुंभ-घरात एखादे मंगलकार्य होईल.व्यवसाय करणाऱ्या मध्ये आर्थिक चिंता निर्माण होईल.नवीन व्यवहार करतांना जपून करावे.महिलांचा कामात उरक वाढेल त्यामुळे मन प्रसन्न राहील.तब्येतीच्या किरकोळ तक्रारी सोडल्या तर हा सप्ताह आपणास चांगला राहील.
?मीन-या काळात विद्यार्थी वर्गाला अभ्यासाचा कंटाळा येईल मन अस्थिर राहील.कामात काही कारणाने अडथळे येतील.महिलांनी या काळात घरातील वयस्कर व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावि.उष्णतेचे विकार होतील.हासप्ताह तसा सामान्य राहील.संतती संबंधित एखादी चांगली बातमी कळेल.
?जोतिष?
उषा सुभेदार
कोरे गल्ली,
शहापूर, बेळगाव,
8762655792